सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०१.२०२०
पाटण- तालुक्यातील जि.प. प्रार्थमिक केंद्र शाळा, मल्हारपेठ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा (दि.०२) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील शिक्षकांनी गेल्या महिन्याभरापासून मोठ्या मेहनतीतून हा कार्यक्रम साकार केला. मा.श्री.विजय पवार सदस्य जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन व स्टेज उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विजय पवार सदस्य, जिल्हा परिषद, सातारा व मा.श्री.सुरेश पानस्कर सदस्य, पंचायत समिती पाटण यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे रोपे देवून स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य, सातारा मा.श्री.विजय पवार यांनी मातृभाषेतून शिक्षण यशस्वी जीवनासाठी कसे आवश्यक आहे त्याचे महत्त्व विषद केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, यासारख्या सामाजिक समस्या नाटकातून, गीतातून मांडण्यात आल्या. यावेळी देशभक्तीपर गीते, लोकगीते, कोळी गीत लिलीपूट, बालगीते, उखाणे, नाटक, यासारख्या विविध प्रकारच्या गीतांचा समावेश होता. जि.प.प्राथमिक केंद्र शाळा, मल्हारपेठ या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा बालकांच्या विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले.
विद्यार्थ्यांनी नयनरम्य कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमप्रसंगी वनपरिमंडल अधिकारी संजयकुमार भाट, वनरक्षक रामदास घावटे, मल्हारपेठ पोलिस दुरक्षेत्र सहाय्यक फौजदार संतोष कोळी, ग्रामपंचायत सदस्य अवधुत कांबळे, जगन्नाथ पवार, सुषमा चव्हाण, भाग्यश्री हिरवे, दादासाहेब पवार तरूण भारत पत्रकार, मुख्याध्यापक अपशिंगे सर नारळवाडी शाळा, राकेश चव्हाण आबदारवाडी शाळा, संकपाळ सर मंद्रुळ हवेली शाळा, साबळे सर गिरेवाडी शाळा, धनराज अडसुळे सर, शंकर कदम सर चौगलेवाडी शाळा व मल्हारपेठ नगरीतील ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापीका स्वाती कदम, शिक्षिका फल्ले मॅडम, शिक्षक जाधव सर या सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम संस्मरणीय केला. पाटण तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मा.योगेश हिरवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन पोवार मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापीका स्वाती कदम यांनी केले.



















