मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०६.०२.२०२०
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमचं आवाहन आहे त्यांनी तिथीचा हट्ट सोडावा आणि १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर करावी, असं ट्वीट राष्ट्रवादीच्या वतीने अमोल मिटकरी यांनी केलं होतं. या राष्ट्रवादीच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राष्ट्रवादीच्या आग्रहामुळे मुख्यमंत्री यांनी तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करणार आहेत. तर शिवसेना मात्र तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकिय शिवजयंतीच साजरी करतील आणि शिवसेना पूर्वीपासून जशी तिथीनुसार शिवजयंती साजरी करते, त्याच पद्धतीने यंदाही करेल, असं परब म्हणाले आहेत.दरम्यान, शिवजयंतीबाबतच्या तिथी आणि तारखेबाबतचा निर्णय घ्यायला शासनाकडे वेळ कमी असल्याने सरकार स्थापन झाल्यानंतरची पहिली शिवजयंती ही तारखेप्रमाणेच होईल. यानंतर सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परब यांनी दिली आहे.



















