पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.११.२०१९
पुणे- येथील निलकमल सोसायटी इंदिरानगर येथे प्रेरणा प्रोडक्शन निर्मित डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही या बहुचर्चित वेब सिरीजच्या चित्रीकरणास क्ल्याप देऊन सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही” ची सर्व टीम उपस्थित होती.निर्माते किरण शिंदे,दिग्दर्शक व पटकथा लेखक रघुनाथ कदम,DOP अक्षय शिंदे,सहायक तुषार मिसाळ,संगीतकार उमेश मिसाळ,बापू ननावरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गायकवाड,गौतम पायाळ,वाघमारे,प्रशांत,यांचेसह नागरिक व कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.मान्यवरांना भारताचे संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.ही वेब सिरीज सामाजिक जाणिवेतून निर्माण करण्यात आली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास निर्माते व दिग्दर्शक यांनी यावेळी व्यक्त केला.



















