तेल्हारा पोलिसांची मोठी कारवाई; चोरीची मोटारसायकल व आरोपी जेरबंद
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, रवींद्र वीरघट
दि. २७.०७.२०२६
तेल्हारा – तेल्हारा पोलिसांनी मोटरसायकल चोरीत यशस्वी छडा लावत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून एम एच ३० सी ए ७४४० क्रमांकाची सुमारे ५० हजार रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचा तपास सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष इगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल तायडे व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन ठाकूर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल तायडे करीत आहेत.



















