सोलापुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०२.२०२०
माळशिरस- माघ पोर्णिमा व त्यागमुर्ती माता रमाई जयंती नातेपुते येथे मोठ्या उत्साहात साजरी करन्यात आली.
भारतीय बौध्द महासभेचे सर्व तालुक्याचे पदाधिकारी व वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..
यावेळी बौध्दाचार्यां कडून उपदेश देन्यात आले की कुटूंबावरती बौध्द संस्कार कसे रुजवले पाहिजेत.जर कुटूंबातील एका महिलेवरती जरी बौध्दसंस्कार असेल तर ती आपल्या पुर्ण कूटूंबावरती बौध्द संस्कार देते.
माता रमाई यांनी केलेला त्याग आणि त्या त्यागातून डॉ बाबासाहेब आंबेडकर कसे घडले हे सांगण्यात आले.
तसेच माघ पोर्णिमेचे महत्व सांगण्यात आले.भगवान गौतम बुध्दांच्या जिवनात ज्या काही गोष्टी घडल्या त्या पोर्णिमेला घडल्या.
माघ पोर्णिमेला त्यांनी महापरिनिर्वानाची घोषना केली..
तसेच बुध्दांचे लाडके शिष्य भन्ते आनंद यांचा महापरिनिर्वांन हा माघ पोर्णिमेला झाला तसेच संत रविदास यांचा जन्म माघ पोर्णिमेलाच झाला.
कार्यक्रमाला उपस्थित भारतीय बौध्द महासभेचे पांडूरंग भोसले, नवनाथ कांबळे, मिलींद मिसाळ, गौतम जगताप, भारत सरवदे, भिमराव कांबळे, बनसोडे सर, दुर्योधन काटे, आण्णा भोसले, सुनील चव्हाण, तानाजी साळवे, बाळासाहेब भोसले सर, शिवाजी सावंत, उषाताई मिसाळ, मोरे मावशी, कांबळे मावशी, रोहीणी सावंत
वंचित बहूजन आघाडीचे धर्मा सावंत, रामभाऊ सावंत, सुभाष सोरटे, बबलू वनसाळे, बुध्दभूषन आखाडे, अजित पवार, बापू केंगार, प्रितम साळवे, सलमान शेख आदि सर्व उपस्थित होते.



















