धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचा विराट मोर्चा; मुसळधार पावसातही मोठा प्रतिसाद
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. २४.०७.२०२६
पुणे- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शनिवारी पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठा मोर्चा काढला. मुसळधार पाऊस सुरू असतानाही शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या आंदोलनात सहभागी झाले.
शनिवार वाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी विविध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. आंदोलनात सहभागी विद्यार्थी हातात फलक आणि क्रांतिकारकांची छायाचित्रे घेऊन सहभागी झाले होते.
आंदोलकांनी NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवरील कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
मुसळधार पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.



















