पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.३१.०७.१९
मावळ- तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ शहरात अनेक शासकीय कार्यालये अस्तित्वात असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी न्यायालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सब रजिस्टर कार्यालय व अनेक शासकीय कार्यालये असल्याने तसेच शहराच्या मध्यवर्ती मोकळी जागा नसल्याने वाहनतळाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे त्यामुळे अनेक प्रश्न वडगाव शहराला भेडसावत असून शहरात क्रिडागंण, नाट्यगृह, वाहनतळ, सार्वजनिक उद्यान तसेच पुरुष व महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह तयार करणे
याकरिता तालुका भात संशोधन केंद्राच्या मालकीची जागा सर्वे नं २२०,२२२,२२३ क्षेत्र ६ हेक्टर २० आर हि जुना पुणे मुंबई महामार्ग क्रमांक ४ लगत रस्त्याच्या उजव्या बाजूस असल्याने सदर जागा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने जर हया एकूण जागे पैकी काही एकर जागा वडगाव नगरपंचायतीला महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध झाली तर तालुक्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न सुटले जातील.
सदर जागा उपलब्ध झाल्यास वडगाव शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिकांची समस्या दूर होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहून शासनदरबारी पाठपुरावा करावा असे निवेदन नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांना दिले. यावेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले,नगरसेविका सुनिता भिलारे आणि नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.



















