नाशिक (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०५.०१.२०२०
मनमाड- पंचशिल सार्वजनिक वाचनालय हुडको, मनमाड च्या वतिने नवनिर्वाचित मा.आमदार श्री.सुहास (अण्णा) कांदे यांचा सत्कार व शाळकरी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पंचशिल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मा.प्रविण डी.पगारे हे होते विचार पिठावर. सत्कारार्थी प्रमुख पाहुणे मा श्रि.नांदगाव विधानसभा आमदार सुहास (आण्णा )कांदे उपस्थित होते. राजु पारीख व्यापारी स.अध्यक्ष, गंगा दादा त्रिभुवन नगरसेवक. बाकलिवाल, जेष्ठ नागरिक स.अध्यक्ष मयुर, भाऊ बोरसे शहर अध्यक्ष व नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते.
आमदारच्या हस्ते वाचनालयांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत नंबर प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
वाचनालय संचालक मंडळाच्या वतिने सत्कारार्थी मा.आमदार साहेबांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचलन आनंद शिंनगारे यांनी केले मा.वाचनालय संचालक एस.एम.भाले यांनी मार्गदर्शन केले
आयोजन नियोजन सदस्य संसारे गुरूजी, नाना घोडके, खडताळे, सुनील पवार,मुकुंद उबाळे, संचालक मंडळाने केले विशेष सहकार्य स्वप्निल बोदडे ग्रथपाल, साहेबराव धिवर, रवि निकम, मोनिष चाबुकस्वार, बाळा म्हस्के, किरण पगारे, कैलास गायकवाड, गुरू उबाळे, गणेश ऐळिंजे, राकेश पगारे आदिंनी परिश्रम घेतले.



















