मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१३.०८.२०२२
नवीमुंबई-रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून नवी मुंबई जिल्हाप्रमुख खाजामिया पटेल व घर हक्क संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष हिरामण पगार यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने केलेल्या सी.एन.जी. गॅस, घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल यांच्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ दरवाढीच्या विरोधात व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यपदार्थांवर जी.एस.टी. लावून एक प्रकारे गरिबांची थट्टा केल्याबद्दल दि. १२ ऑगस्ट रोजी वाशी, नवी मुंबई येथील छ.शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रिपब्लिकन सेना, स्वराज्य इंडिया, घर संघर्ष कृती समिती व नवीमुंबई विकास आघाडीच्या घटक पक्षा चे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नवी मुंबई उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, चांद पठाण, सचिन जाधव, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे, उपाध्यक्ष दीपा बंम, युवा जिल्हाप्रमुख सुनील वानखेडे यांच्यासह सी.बी.डी. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, घनसोली, तळवली येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेध सभेत आवर्जून उपस्थित होते. सभेच्या शेवटी रिपब्लिकन सेना विधानसभा प्रमुख प्रकाश वानखेडे यांनी पोलीस प्रशासन, पत्रकार बंधू व उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. या सभेत विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.



















