नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३५.१२.१९
नाशिक- पतंग महोत्सव दिवसेंदिवस जवळ येत असताना आत्ता जीवघेणा नायलॉनचा मांजाच्या विक्रमी उत्पादन, विक्री व वापरा विरोधातील पाश आवळला गेला आहे नुकतेच जिल्हाधिकारी यांनी मांजा वर बंदी घालण्याचे आदेश काढले असुन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या स्वाक्षरीने हे आदेशाचे पत्र सर्व पोलीस अधिक्षकांना पाठविण्यात आले आहे. यामुळे मांजा विरोधी मोहिमेला बळ मिळाले असुन नायलॉन मांजाच्या दुकानातील विक्री सह ऑनलाईन विक्रीवर बंदी घालण्यात येवुन वापरणाऱ्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काॅगेस अध्यक्ष आबांदास खैरे सह डाॅ.संदीप चव्हाण, दिपक पाटील, संतोष भुजबळ, नीलेश कर्डक सह विविध स्तरावरील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मांजा वापर विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती दिली आहे. पतंग महोत्सव साठी प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यासह प्रत्येक तालुक्यातील सबंधीत यंत्रणा याच्याकडून आत्ता या आदेशाची अंमलबजावणी होवुन नायलॉन मांजाच्या दुकानातील विक्रेत्यांविरूध्द कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. दरवर्षी नायलाॅन मांजामुळे शेकडो पक्षी मृत होतात त्यापेक्षा ही जास्त जखमी होतात. रस्त्यावरून जाणारे दुचाकी चालकही दुर्घटनाग्रस्त होत असल्याने राष्ट्रवादी युवक काॅगेस अध्यक्ष आबांदास खैरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे शशिकांत ऊन्हवणे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अण्णा साहेब कटारे, युवक काॅगेस अध्यक्ष धोंडीराम आव्हाड, जयहिदं मित्र मंडळाचे देवाभाऊ वाघमारे सह यांनी दोन वर्षापुवीच नायलाॅन मांजा विरूध्द मोहीम हाती घेतली होती त्यामुळे मांज्या विक्रेत्यांवर पोलिसांनी धाडीटाकुन शेकडो टन मांजा जप्त केला गेल्यामुळे धाक निर्माण झाला असुन अनेकांनी हा जीवघेणा मांजा न विकण्याची शपथ घेतली आहे.



















