निगडी प्राधिकरणातील भेल चौकात पावसाचा फटका; खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंपाउंड भिंत कोसळली.
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, देवाम्मा ददली
दि. ०५.०७.२०२६
पिंपरी- निगडी प्राधिकरणातील भेल चौक परिसरात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मुसळधार पावसामुळे कंपाउंड भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने या घटनेत दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी इमारतीच्या पायाभरणीसाठी खोदकाम सुरू असून खड्डा तयार करण्यात आला आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे माती खचल्याने कंपाउंड भिंतीचा काही भाग थेट खड्ड्यात कोसळला. त्याखाली 2 कामगार अडकले होते. त्यांना नागरिक आणि अग्निशमन विभागाने रिस्क्यू करत रुग्णालयात पाठवले
घटनेनंतर परिसरात काही काळ खबरदारी घेण्यात आली. सुदैवाने भिंत कोसळताना कोणतीही व्यक्ती किंवा वाहन त्या ठिकाणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.



















