पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.२४.०६.१९
पिंपरी- गोविंद शेट्टी उद्यान पिंपरी येथे पर्यावरण व जलसंवर्धन समितीतर्फे वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमास जागतिक जल अभ्यासक श्री.रामदासजी जंगम तसेच विक्रवीर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद श्री.संभाजी बारणे तसेच पर्यावरण व जलसंवर्धन समितीचे अध्यक्ष श्री.मुझफ्फरी नामदार व सचिव श्री सुभाष गुगळे त्याचप्रमाणे नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा सौ पूजा सराफ व माजी मा.स्विकृत नगरसेवक श्री शरद दुणावत यांचेसह ब्राह्मण समाजाचे उपाध्यक्ष श्री गणेश विपट तसेच उद्यान व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ जयश्री प्रसाद, प्रफुल्ला शेट्टी,हिना संघवी,ललिता जैन,कविता जैन सुमित्रा जैन हे सर्व उपस्थित होते.सदर कार्यक्रमास मनपातर्फे १०० रोपे देण्यात आली त्यापैकी या उद्यानात दहा रोपे लावून वृक्षरोपणाची सुरुवात करण्यात आली उरलेले रोपे मनपा हद्दीत वेगवेगळ्या जागी लावून उद्दिष्ट पुरे करण्याचे ठरले.प्रमुख पाहुणे म्हणून श्री जंगम यांनी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे या मुद्द्यांवर भर देऊन आपले विचार व्यक्त करीत सर्वांना झाडे लावण्याचे आवाहन केले श्री मुझफ्फर इनामदार यांनी पर्यावरणाचे महत्त्व विषद केले श्री सुभाष गुगळे यांनी आभार प्रदर्शन केले.या वेळेस असंघटीत कामगार संघटना राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा मीनाताई मोहिते सचिव कविता खराडे या देखील हजर होत्या.