◆ प्रशासन व कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना बस अभावी फटका
◆ पळसगांव पेटगाव रस्तावरील पूल देतो अपघाताला निमंत्रण
चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०६.१९
चिमूर- मासळ पळसगाव पेटगाव रस्ताचे काम हे गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे रस्ताच्या दुतर्फा नाली खोदकाम करून अवधा १२ ते १५ फूट रस्ता रुंद असलेला रस्ता अरुंद असून बफर झोनच्या नावाखाली अरुंद रस्ता असल्याचं बोलल्या जात असून या रस्ताच्या स्लीपिंग मातीने भरून त्या वर फक्त माती झाकण्या पुरती मुरूम टाकन्यात आला आहे, की काय?अशी स्थिति झाली आहे सदर रोडवरील पूल बांधकाम करिता पर्याय मार्ग चा वापर करिता मार्ग काढला परंतु त्या मार्गाने पहिल्या पावसात गेल्या दोन दिवसांपासून लाल परी बंद असून प्रवासी विद्यार्थीला याचा फटका बसत आहे. मांसळ पळसगांव रोड वरील नवीन पुल मात्र अपघाताला निमंत्रण देत आहे कुटल्याही प्रकारचे उंचावठा न ठेवता सरळ पूलाचे बंधकाम केले आहे खाली जागा खोल असून वाहन चालविताना वाहन धारकांना कसरत करावी लागणार आहे. वाहन चालकाला साईड देताना जीव मुठीत घेहून वाट काढावी लागत आहे एवढा मोठा दोष असताना संबंधित प्रशासन या कडे लक्ष देतील काय? गप्पा का?असा प्रश्न जनतेला पढला आहे, या रोडवरती भ्रष्टाचार झाला तर नसावा? असा प्रश्न निर्माण केल्या जात आहे,याच रस्तावर आत्ता ही परिस्थिती आहे तर भरपावसाळ्यात चिखल झाल्यावर किती गंभीर घटना घडेल हे नाकारता येत नाही ,तरी संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ दखल घेऊन दोषी आढळल्यास त्या कंत्राटदारंवार कारवाही करावी व जनतेला या त्रासातून मुक्त करावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.



















