पिंपरीगाव बस स्टॉपवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार; प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी, स्वप्नील इंगळे
दि.२८.०७.२०२६
पिंपरी- पिंपरीगाव बस स्टॉप परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने प्रवासी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी सकाळी बस स्टॉपसमोरील मुख्य रस्त्यावर अनेक गायींचा कळप फिरताना दिसला. त्यामुळे काही काळ वाहतूक संथ झाली आणि वाहनचालकांना सावधपणे मार्ग काढावा लागला.
बस स्टॉपवर रोज शेकडो नागरिक बसची वाट पाहत असतात. अशा ठिकाणी मोकाट जनावरे फिरत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.



















