पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.११.०७.१९
पिंपरी- शहरातील कॅम्प, कपडा मार्केट, रिव्हर रोड, भाजीमंडई सर्वत्र पिंपरी कँम्प परिसरात गेल्या आनेक वर्षा पासून चोरीच्या लाईटचा प्रकार बिनधास्त पणे केला जातो. या परिसरात सर्वच डिपी उघड्यावर दिसून येतात MSEB अधिकारी मात्र पूर्ण पणे दूर्लक्ष करतांना दिसत आहेत. चोरीच्या लाईन टाकणाऱ्या व हप्तेखोरी करणाऱ्या आधिकाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पिंपरी कॅम्प परिसरातील सर्व डिपी ट्रान्सफार्म झाकणे बसवून झाकण कायम स्वरुपी बंद ठेवण्यात यावी. आशी मागणी पिंपरीतील मातोश्री ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी निवेदना द्वारे केली आहे.



















