नाशिक(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.१०.२०२०
निफाड- तालुक्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्या मालाचा मोबदला पैसे घेण्यासाठी गेले असता शेतकऱ्याला आडत दारा कडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला यामुळे संतप्त शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे संबंधित संशयीता वर पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत माहिती अशी की निफाड तालुक्यातील कारसुळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव वय ३७ वर्षे यांनी टोमॅटो विक्री आशिया खंडात नावलौकिक असलेल्या पिंपळगाव बाजार समिती जोपुळ रोड बाजार समितीत केली होती अनेक दिवसापासून जाधव यांनी विक्री केलेल्या मालाची रक्कम सावतामाळी आडत बाकी होती शुक्रवारी आपल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेले असता आडत कर्मचारी दत्तू विधाते ज्ञानेश्वर विधाते यांनी जाधव यास जबरदस्त मारहाण केली यामुळे सर्वत्र शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार रामदास गांगुर्डे बाळकृष्ण नाठे पुढील तपास करीत आहेत.



















