पिंपरी,चिचंवड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, संदिप जोगदंड
दि. २७.०९.१८
तीन दिवसापूर्वी अपहरण झालेल्या बालिकेचा मृतदेह आज पिपंरी येथील एच. ए.मैदानात मिळाला. बालिकेवर अत्यचार केल्याचा संशय वक्त केला जात आहे.
रमाबाई नगर येथील गोपाळ पुणेकर यांची सात वर्षाची मुलगी धनश्री तीन दिवसा पूर्वी बेपत्ता होती.याची फिर्याद धनश्रीची आई अर्चना गोपाळ पुणेकर यांनी पिपंरी पोलीस स्टेशनला दिली होती.
सर्वत्र शोध घेतल्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या संबधित यंत्रणांनी धनश्रीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यात यश मिळाले नाही. आज (गुरुवारी) सकाळी तिचा मृतदेह पिंपरी मधील एच ए मैदानावर लहान झुडुपांमध्ये आढळला. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय. सी. एम. हॉस्पिटल मधे पाठवला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धनश्रीचे आई अर्चना आणि वडील गोपाळ दोघेजण सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजी आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले. दरम्यान धनश्रीचे अज्ञात आरोपीने अपहरण केले. रात्री साडेसात वाजता आई-वडील भाजी घेऊन घरी आले. त्यावेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. गोपाळ यांनी त्यांच्या भावाकडे चौकशी केली. तेंव्हा त्यांनी सांगितले की, ‘धनश्री आई-वडिलांच्या मागे गेली होती.’ म्हणून त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु धनश्री बाबत काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, धनश्री ज्या परिसरातून गायब झाली, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता धनश्री तिच्या शेजारी राहणा-या एका ३० वर्षीय इसमासोबत जात असल्याचे आढळले आहे अशी माहिती पोलिस अधिकारी पाटिल मैडम यांनी निर्भिड पत्रकारला दिली. अपहरण, अत्याचार आणि खून झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंजवडी येथे दोन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला काही दिवस जातात तोच पुन्हा लहान बालिकेवर अत्याचार करून खून केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.



















