चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.१९.०३.२०२०
चिमूर- पळसगांव(पि) वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पारणा पिपर्डा पळसगांव परिसरात वाघाने धुमाकूळ घातला असून पारणा परिसरातील पारणा बिटच्या कम्पार्टमेंट नं.८५९ मध्ये गावालगत वाघाने बैलची शिकार केली. वाघ रोज गावकऱ्यांना दिसत असुन त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पशुपालकांनी बैल गुराख्यामार्फत जंगलात चरायला सोडल्या होत्या. बैलच्या कळपावर हल्ला करुन बैल ठार केले. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या गायीची वाघाने शिकार केली. जनावरांवर वांरवार वाघाचा हल्ला होत असल्याने गावकऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे.मागील दिवसा पासून रोज वाघाचे पिल्यासह दर्शन होत असल्याने गावकऱ्या मध्ये भीती आहे,पळसगांव येथील वनविभागाने वेळीच वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना त्याचा आर्थिक मोबदला दिला जाईल.असे वनपाल सुरजगाडे व वनरक्षक आमावर यांनी सांगितले.



















