पुन्हा एकदा महाराष्ट्रात पेपरफुटीच्या आरोपांनी खळबळ; MPSC Drug Inspector भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, जितेंद्र तायडे
दि.२८.०७.२०२६
मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत घेण्यात आलेल्या Drug Inspector भरती परीक्षेबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका WhatsApp वर फिरल्याचा दावा, गुणांमध्ये कथित गैरव्यवहार आणि अधिकृत तक्रारींसह पुरावे सादर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी काही लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी केली असून, संबंधित तक्रारींची सत्यता पडताळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे, MPSC ने काही आरोपांवर प्रश्न उपस्थित करत कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, भरती प्रक्रियेवरील विश्वास टिकवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी हो



















