बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,महादेव काळे
दि.२८.०६.१९
धानोरा- डोंगराळ भागात असलेली जिथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. अशा परिस्थितीत शाळेतील एक विद्यार्थीनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती धारक बनते हि काही साधी गोष्ट नसून शिक्षकांच्या आणि विद्यार्थीनीच्या परिश्रमाचे यश आहे. गेल्या वर्षी कु. वैभव मुकेश आगलावे व या वर्षी कु.कोमल शिवाजी नरवडे ही विद्यार्थीनी शिष्यवृत्ती धारक बनल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी असे यश मिळाल्याने त्या शाळेतील विद्यार्थी,शिक्षक,शा.व्य.समिती आणि ग्रामस्थाच्या आनंदाला पारावार उरला नाही.या गुणी विद्यार्थीनीचा सत्कार शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री.रविंद्र नरवडे,केंद्रप्रमुख श्री.बहीर साहेब,मा.केंद्रप्रमुख शिंदे साहेब सरपंच श्री.संदिप पानसांडे, ग्रा.पं.सदस्य श्री.राहूल पवार,माजी सरपंच श्री.संदिप सानप ,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सतिश जाधव व सहशिक्षक श्री.रामेश्वर देसाई,पवार सर,महेंद्र काळे,गोरख नरवडे,जालींदर नरवडे,बाबू नरवडे,हनुमंत डोंगरे,मुकेश आगलावे,रामेश्वर आगलावे,मच्छिंद्र जगताप आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.आष्टीपासून १२ कि.मी.वर डोंगराळ भागात असलेली जिल्हा परिपषद प्राथमिक शाळा १ ते ५ वर्ग,पट २२ असणारी द्विशिक्षकी शाळेतील इ.५वी ची विद्यार्थीनी कु.कोमल शिवाजी नरवडे ही विद्यार्थीनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत ग्रामीण सर्वसाधारण यादी मध्ये J १६०/२०६ नुसार शिष्यवृत्ती धारक झाली आहे.तिला २९६ पैकी १७२ गुण आहेत .या यशामध्ये या शाळेतील सहशिक्षक रामेश्वर देसाई,सतिश जाधव मुख्याध्यापक या दोन्ही शिक्षकांनी घेतलेले परिश्रम व विद्यार्थीनीने केलेला प्रमाणिक पणे अभ्यास यामुळे आंबेवाडीची शाळा परिसरात अव्वल म्हटली तरी वावगे ठरणार नाही.या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनीचे शा.व्य.समितीचे अध्यक्ष रविंद्र नरवडे,उपाध्यक्ष भरत डोंगरे,मुख्याध्यापक जाधव सर,देसाई सर,ग्रा.प.सदस्य राहूल पवार,पवार सर,उपसभापती आदिनाथ सानप,सभापती अशोक दादा ईथापे,विस्तार अधिकारी गुंड साहेब,धस साहेब,गटशिक्षणाधिकारी शिंदे साहेब,केंद्रप्रमुख बहीर साहेब शिंदे साहेब,मु.अ.खुळपे सर,पत्की मॅडम, सरपंच संदिप पानसांडे,डॉ.संदिप सानप, उपसरपंच हराळ,पत्रकार संतोष सानप,केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन केले.



















