पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०९.२०२१
पिंपरी- पोलिसांची प्रतिमा सध्या डागाळली असून सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला की काय ?,
अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे, अशी खंत ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी रावेतला बोलताना व्यक्त केली. राज्याच्या राजकारणात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण्यांची शिवराळ भाषा याविषयी अॅड. निकम यांनी नाराजी व्यक्त केली. पिंपरीतील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमरसिंह निकम लिखित ‘अ होमिओपॅथस गाईड टू कोविड १९’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच ‘होमिओपॅथी कोविड हिरो’ पुरस्काराचे वितरण अॅड. निकम यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आमदार प्रसाद लाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह प्रशांत दबडघाव, डॉ. बाळकृष्ण गायकवाड आदी उपस्थित होते. अॅड. निकम म्हणाले, की कृष्ण प्रकाश हे कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती आहे. अशा अधिकाऱ्यांचे नक्कीच अप्रूप वाटते. त्याचवेळी खंतही वाटते,
की पोलिसांची प्रतिमा सध्या डागाळलेली आहे.