मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०२.२०२०
ठाणे- येथील वागळे इस्टेट परिसरामध्ये ठाणे शहरातील बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अंतर्गत प्रेरणा फाउंडेशनच्या पहिल्या शाखेचे दिमाखात उदघाटन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या अद्ययावत ऑफिसचे प्रमुख पाहुणे सुखदेव उबाळे यांच्या हस्ते रिबीन कापून सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे उपस्थित होते.दीप प्रज्वलन वाहुरकर गुरुजी,प्रल्हाद मगरे, कांबळे साहेब,लक्ष्मण सोनवणे यांनी केले तर पंचशील व त्रिसरण वाव्हळकर गुरुजी यांनी घेतले.कार्यक्रमास मोरे गुरुजी,पुण्याहून सुमित गायकवाड,केतन जगताप,संदीप जोगदंड,संजीत खर्वे,विकास ओव्हाळ,मुंबईहून सुभाष चव्हाण,अनिल जाधव सुहास शिंदे,भारत साळवे,वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष संजय मिरगुडे ,शुभ सागर हॉटेलचे नरेश कांबळे,पवन खरात,राजश्री गरुड,ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम वानखेडे, समाधान सूर्यवंशी,सुषमा खरात, वर्षा खरात,बबन खरात,पूर्वी खरात,संगीता धुमाळ,छाया साळवे,कुंदा मार्टिन,रोहित खरात, प्रशांत साबळे,रवी आगळे,एड प्रशांत सोनवणे,चंद्रकांत साळवे, गणेश बहारे,सूर्यकांत साळवी, पंचशील मगरे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माता रमाईची जयंती मोठया उत्साहात साजरी केली गेली.माता रमाईच्या जीवनावर किरण शिंदे यांनी विचार मांडले.अध्यक्ष भारत साळवे यांनी सूत्रसंचालन केले.मान्यवरांनी संस्थेच्या कार्यास सदिच्छा दिल्या.



















