सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०२.२०२०
अन्न व औषध प्रशासन सातारा जिल्हात प्रतिबंधित गुटखा बंदी असून सुद्धा विक्री खुलेआम सुरू. प्रामुख्याने फलटण तालुक्यात सुरवडी कमिन्स कंपनी शेजारी किराणा दुकानत त्या मालक विक्रमसिंह भाटी यांच्या दुकानांमधे खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसत आहे. एकीकडे प्रशासन पूर्ण गुटखा विक्रीच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. काही पत्रकार बंधूंनी एका टपरीवर गुटखा मिळतो का याची विचारणा केली असता. त्याच्याकडे गुटखा असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी सुरवडी गावातील काही ग्रामस्थांनी पानठेल्याची झाडाझडती घेण्याचे ठणकावून सांगितले या झाडाझडतीमध्ये गुटखा पुड्या आढळून आल्याने ग्रामस्थांकडून पानपट्टी आणि किराणा दुकानांची ही चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



















