सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०५.११.२०२०
सांगली- ५ नोव्हेंबर ही थोर निसर्ग साहित्यिक श्री. मारुती चितमपल्ली यांची जन्म तिथी आणि १२ नोव्हेंबर ही थोर पक्षी तज्ञ भारतरत्न डॉ. सलीम अली यांची जन्म तिथी हे औचित्य साधून ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना’ गेली अनेक वर्षे नोव्हेंबर ५ ते १२ या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करीत आहेत महाराष्ट्र पक्षी मित्राने केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हा सप्ताह ‘पक्षी सप्ताह’ म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे.
‘बर्डसॉग’ ही संस्था सांगली येथे पक्षी गणना, पक्षी संरक्षण, संवर्धन जागृती, चर्चासत्रे, प्रदर्शने, कार्यशाळा असे पक्षांच्या विषयी प्रेम व जण जागृती निर्माण करणारे विविध कार्यक्रम आयोजित करत असते. तथापि कोविड साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता बंद ठिकाणी कार्यक्रम न घेता पक्षी गणना सर्व नियम पाळून करणार आहे. पक्षी गणना सर्वासाठी विनामूल्य आहे. आपल्या सोईनुसार आपण सहभागी होऊ शकता. सहभागी होऊ इच्छनारे आपल्या सोबत वही, पेन, स्वतःची दुर्बीण, पुस्तक, कॅमेरा असल्यास सोबत आणावा. सर्वानी मास्क, सुरक्षित अंतर हे नियम पाळायचे आहेत. स्वतःच्या जबाबदारीवर सहभागी व्हायचे आहे. पक्षी गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावा असे आवाहन सांगलीचे पक्षी अब्यासक श्री. शरद आपटे यांनी केले आहे.
सांगली- श्री शरद आपटे ९८९०३८४४००
विश्रामबाग – डॉ. अनिश कानिटकर, ९७३०३०२५५०
हरिपूर – डॉ. समीर गुप्ते,९८२२०४५११४
मिरज – अँड. बसवराज होसगौडर,९७६२५५८०६६



















