सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,नारायण पवार
दि.२२.०९.१९
माळशिरस- बहुजन ब्रिगेडचे जाळे राज्यातील १८ जिल्ह्यात पसरले आहे व संघटनेचे कार्य उत्कृष्टपणे चालू आहे १८ जिल्ह्यात विधानसभेच्या ९५ ठिकाणच्या जागा संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले ते माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मधे विविध प्रकारच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम सक्रियपणे चालू ठेवणार असल्याने सर्वसामान्यांची नाळ संघटनेला जोडली गेली आहे.दत्ता कर्चे यांनी सांगितले की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शेतकर्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच वंचित शोषित पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन ब्रिगेड संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे निवडणुकीत युती संदर्भात समविचारी पक्षांसोबत चर्चा व बोलणे सुरू आहे अशी माहिती प्रमुख संघटक दत्ता खर्चे यांनी निर्भिड पत्रकार दिली.



















