बारामती(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३०.०९.१९
बारामती- महाराष्ट्र विधानसभा २०१९ ची विधानसभा ही शिवसेना भाजप व मित्रपक्ष एकत्रित लढणार असून याबाबत चे संकेत मा.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केली गोपीचंद पडळकर यांच्या सारखा लढववय्या उमेदवार दिल्याने बारामती विधानसभा मध्ये जोरदार सामना पाहायला मिळणार आहे.
याअगोदर युती मध्ये बारामती विधानसभाची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर भाजपने उमेदवारी घोषित केली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अँड. राजेंद्र काळे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी ला विरोध दर्शविला असून बारामती तालुका शिवसेना तटस्थ राहणार असल्याचे एका वृत्त वहिनीला जाहीर केले आहे तर दुसरीकडे भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीच समर्थन केले असून महायुतीच्या उमेदवारवाराला फक्त शिवसेनाच्या ठराविक लोकांचा विरोध असल्याचे समजते.तसेच गोपीचंद पडळकर यांना विरोधाचे वक्तव्य हे जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे यांचे वैयक्तिक वक्तव्य असून बारामती मधील शिवसेना,युवासेनाचे पदाधिकारी शिवसैनिक व युवासैनिक हे महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार असून शिवसेना पक्षप्रमुख मा, उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई येथील रंगशारदा येथील पदाधिकारी मेळाव्यात महायुतीच्या दिलेल्या उमेदवाराच काम प्रामाणिकपणे व मेहनतीने करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांनी दिलेला आदेश हाच अंतिम असल्याने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी पूर्ण बारामती शिवसेनेची ताकत उभी राहणार आहे असे युवासेना जिल्हाप्रमुख राहुल शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख adv अनिल शेडगे, शिवसहकार सेनेचे मा,तालुकाप्रमुख दिलीप नाळे,शिवसेना मा,तालुका उपप्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योती गाडे यांनी सांगितले.



















