चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०३.०२.२०२०
नागभिड- वन परिक्षेत्र विभागातील रेंगातुर येथील श्रीरामे यांच्या गट क्र ५२ मधे २ वर्ष वयाचा बिबट्या मयत अवस्थेत दिसून आला याची माहिती शेतकरी यांनी वन विभाग नागभिड येथील वनपाल वाडके यांना कळविले माहिती मिळाताच त्यांनी रेंगातूर येथील घटना स्थळाला भेट दिली असता बिबट्याचे शव विच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे कारण समजले जाईल. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी पंचनामा करून वैद्यकीय तपासणी न झाल्याने बिबट्याचे शव आगारात ठेवण्यात आले असून उद्या सकाळी शव विच्छेदन केल्यानंतरच मृत्यू कश्याने झाला आहे असे सांगितले जाईल अशी माहिती दिली.



















