महाबळेश्वर : (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी
दि.०२.०९.१८ येथील बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने गेले वर्ष भरापासुन महिलांचे प्रौढ साक्षरता वर्ग चालू आहेत.या वर्गातील महिलांच्या प्रगतीच्या मूल्यमापणासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या परीक्षेत महिलांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. महिलांच्या कामगिरीवर समाधानि असून येत्या काळात महाबळेश्वर शहरातील १००% महिलांना साक्षर करण्याचा माणस असल्याची माहिती यावेळी माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे यांनी निर्भिड पत्रकारला दिली.येत्या काळात बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप तर्फे शहरवासीयांसाठी अनेक विकासात्मक योजना राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या प्रदेशाध्यक्षा (महिला आघाडी) छायाताई शिंदे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.



















