पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१३.०९.२०२१
पिंपरी- बोपोडी चौकी समोरच भर दिवसा डोक्यात फरशी घालून कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रणजित ऊर्फ मॉण्टी सुगंधर परदेशी वय ३२ रा. छाजेड पेट्रोल पंपामागे भाऊ पाटील रोड राधानगरी बोपोडी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉण्टीचे बोपोडीत चिकनचे दुकान आहे. आरोपीचे मयत मॉन्टीशी ओळख होती, त्यांच्यामध्ये पैशाचे व्यवहार झाले होते, मात्र पैशाच्या व्यवहारांमधून त्यांच्यात वाद होते, या वादातून आरोपीने अन्य चार जणांची मदत घेऊन मॉन्टीचा खुन केला असल्याची माहीती समोर येत आहे. मॉन्टीला बोपोडी पोलिस चौकीसमोर पुणे मेट्रोच्या कामाला लगत बोलावून घेवून डोक्यात फरशी टाकून व कोयत्याने सपासप वार करून जीवे ठार मारले. पोलिसांनी आरोपी सहित अन्य चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून अधिक तपास करित आहे. पोलिस चौकी समोरच काही अंतरावर दिवसा ढवळ्या खून झाल्याने कायद्याचा धाक आहे की नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.