चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)विकास खोब्रागडे
दि.२५/१२/१८
🌑 बौध्द धम्म कसा चांगला हे लोकांना समजावून सांगून धम्माची उंची
वाढवा मा.श्याम रामटेके माजी उपमुख्य कार्यापालन अधिकारी,तथा
अध्यक्ष भा.बौद्ध सभा नागभीड
🌑 भिक्खू संघाद्वारे धम्म धव्यजाचे ध्वजारोहण
🌑 समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना
🌑 क्रांति निळ्या पाखराची समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न
चंद्रपुर, जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील शिवनी रोडवरील रत्नापुरच्या निसर्ग रम्य परिसरात स्त्री मुक्ति दिनाच्या दिवशी सालाबाद प्रमाणे या ही वर्षी धम्म भूमि विकास सेवा समिति रत्नापुरच्या वतीने भव्य बौद्ध धम्म मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मावर टीका केल्याशिवाय झोप येत नाही. टीका करण्याचा हेतू धर्माला चुका, उणिवांवर बोट ठेवून त्या धर्माला सुधारण्याचा आहे की आपला धम्म त्यापेक्षा किती सरस आहे हे दाखविण्याचा प्रयत्न आहे हे समजण्याला मार्ग नाही. आता एकदा हा धर्म सोडल्यावर त्याच्या उणिवा, चुका दाखविण्याची गरज नाही आणि आपली सरसताचदाखवायची असेल इतर धर्माची उंची कमी करण्यापेक्षा आपल्या धम्माची उंची वाढविण्यात ताकद खर्ची केली तर बरे होईल.बुद्ध धम्म म्हणजे अस्सल सोन्याच मौल्यवान रत्नांनी जडललेे खान आहे चला तर मग ,आज स्वयंप्रकाशीत होवून एक निर्णय घेवुया आजपासून बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने आचरणात आनु बुद्धच्या पंचशीलला च्या मार्गावर चालले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगति असून घरोघरी विहारात दररोज वंदना झाली पाहिजे,मेळाव्याचे औचित्य साधून “क्रांति निळया पाखरची सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न करण्यात आला. विजयकुमार पारधी प्रस्तुत क्रांति निळया पाखरची आयु,दिवाकर बारसागड़े (विदर्भचा बुलन्द आवाज )यांचा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम सायं ६ वा. धम्म भूमि पटांगणात साजरा करण्यात आला, महाकारूनिक तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार अभिवादन करून समता सैनिक दल शाखा मोटेगाव, जामसाळ, शिंदेवहीँ येथील समता सैनिक दलाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना देऊन भिखखु संघाव्दारे धम्म ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.पूज्य भदंत नागदीपनकर प्रचारक समता सैनिक दल नागपूर, कैविशताई मेश्राम माजी जिल्हा अध्यक्ष भा. बौद्ध महा सभा चंद्रपूर, मा.मारोतराव कांबळे ब्रम्हपुरी, मा.डॉ. मनोहर टेमबुरकर तळोधी,शयाम रामटेके उपमुख्य कार्यपालन अधिकारी, अध्यक्ष नागभीड, मा.विजय बन्सोड मुख्यप्रवर्तक देसाईगंज वडसा, मा.खुशाल तेलग सर चंद्रपूर, मा.सेवाकचंद नागदेवते जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर, मा.डॉ. दीपक खोब्रागडे रत्नापुर, मा.प्रा.बाजीराव रामटेके मिणघरी, या प्रमुख वक्त्यांची धम्म वर मार्गदर्शन झाली व नंतर स्नेहभोजन करून निळया क्रांती कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. अशाच समाजप्रबोधना च्या कार्यकमातून समाजप्रबोधन घेण्यात यावे. दिवाकर बारसागडे व त्यांची चमू नि आपल्या सुमधूर सुरांनी साजरा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम करण्यात आला .धम्म उपसक व उपसिकांनी आपल्या हाता पायाला मोकळे करून मनसोक्त नाचून आनंद घेतला अशाच समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमातून आपल्या धम्मचा बळकट करू असे सूर या कार्यक्रमातून उमटले.या भव्य अशा धम्म दिनाचे संचालन आभार महेंद्र कोवले यांनी केले.



















