दि.२४.०९.१८ : मुंबई (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)
बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे अध्यक्ष- ठाणे जिल्हा यांचा वाढदिवस आज चैत्यभूमी,दादर येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.यावेळी आरोग्य तपासणी कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पला अनेक नागरिकांनी भेटी देऊन शरीराची मोफत तपासणी करून घेतली.याच वेळी बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे २२ प्रतिज्ञा अभियान राबविण्यात आले.यावेळी संघटनेचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.तर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमास लाभला.या प्रसंगी डाँ. अनिल बिरारे( बदलापुर ) ठाणे,इंजि.राजेेश ढवळे,भारत साळवे,अनिल जाधव(अध्यक्ष पालघर जिल्हा),अँड. रजनीगंधा आगळे(अध्यक्ष महिला आघाडी मुंबई),पंकज कदम(उपाध्यक्ष पालघर),सुरेश जाधव,सुर्यकांत साळवी,प्रथमेश कदम,बीपीन रुके,प्रशांत साबळे,वेदांत माेरे,माणिक ऊमाळे,अँड. निलेश जाधव,अमाेल पटेकर,गाैतम वानखेडे , संगिता वानखेडे, प्रज्ञा वानखेडे यांचेसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.तसेच भारत साळवे यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे,मुंबई अध्यक्ष हर्षवर्धन गंभीरे,उपाध्यक्ष सुहास शिंदे यांनी फोनवरून सदिच्छा दिल्या.या कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



















