सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१८.०३.२०२०
खटाव- तालुक्यातील भोसरे गावाचे सुपुत्र अमरसिंह पोपटराव जाधव यांची सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय पदी निवड झालेली आहे. MPSC राज्य सेवा परीक्षेमध्ये महाराष्ट्रात दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला आहे.
भोसरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून, श्री हनुमान विद्यालय भोसरे येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. मुंबई विद्यापीठ येथे त्यांनी पदवी घेतली. ग्रामीण भागातून शिक्षणाची सुरुवात करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.तहसीलदार योगेश टोंपे व नायब तहसीलदार सुनिल जाधव यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन केले. आई वडिलांचे तसेच सर्व शिक्षकांचे त्यांना चांगले मार्गदर्शन लाभले. भोसरे गावच्या शिरपेचात एक मनाचा तुरा या यशाच्या निमित्ताने खोवला गेला आहे. या यशाचे समस्त भोसरे गावचे ग्रामस्थ तसेच खटाव तालुका व जिल्हास्तरावर त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.



















