सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.१०.२०२०
शिरवळ- महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ. योगेश आण्णा टिळेकर यांच्या सूचनेनुसार संघटनात्मक बांधणी साठी भाजपा ओबीसी मोर्चा सातारा जिल्हा व तालुका कार्यकारणी बैठक ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हा प्रभारी आप्पासाहेब देशमुख, ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस अनुप सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सौ. वीणा सोनवलकर, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवक सह संपर्क प्रमुख निखिल झगडे, ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सह संपर्क प्रमुख नंदकुमार यादव, ओबीसी मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शेजवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे पार पडली. या वेळी प्रारंभी विशाल शेजवळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. लवकरात लवकर ओबीसी मोर्चाची जिल्हा तसेच तालुका कार्यकारणी गठीत करून पदाधिकारी नियुक्ती, प्रदेश अध्यक्ष आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात पक्षविस्तार तसेच विविध कार्यक्रम याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
या वेळी आप्पासाहेब देशमुख, अनुप सूर्यवंशी, विना सोनवलकर, निखिल झगडे, नंदकुमार यादव यांनी पक्ष संघटन तसेच ओबीसी समाजाच्या विविध विषय व प्रश्नांवर उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित तालुका तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांनी ओबीसी समाजाच्या विविध समस्या मांडल्या. सदर बैठकीला ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेंद्र कदम, जिल्हा उपाध्यक्ष संदीप दिक्षित, अमोल भुजबळ, नव नियुक्त कराड उत्तर तालुका अध्यक्ष सुनील दळवी, वाई तालुका अध्यक्ष श्री.जगताप, चिटणीस चिंचकर, सातारा शहर अध्यक्ष श्री सूर्यकांत पानस्कर, गौरव पवार, विक्रम पवार, सूर्यकांत गोरे, भूषण शेजवळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेंद्र कदम यांनी उपस्थितांचे आभार मानून बैठकीचा समारोप केला.



















