हैद्राबाद(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.११.१९
• हैद्राबाद मधील घटनेने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया
हैद्राबाद- दुचाकीचा टायर पंक्चर झाल्याने टोल प्लाझा जवळ मदतीची वाट बघत असलेल्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून जाळून खून केल्याची घटना हैद्राबादमधील शादनगर येथे घडलीय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टर तरुणीचे नाव प्रियांका रेड्डी असून ती एका पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीला होती. बुधवारी रात्री दवाखान्यातुन घरी जाताना ती हैद्राबाद – बैंगलोर महामार्गावरील तोंदुपल्ली टोल प्लाझावर आपली पार्क केलेली दुचाकी घेऊन निघाली होती, मात्र दुचाकी पंक्चर असल्याने तिने याबाबत आपल्या बहिणीला फोन करून कळविले कि, “दुचाकी पंक्चर झाली आहे आणि मला भीती वाटत आहे.” मात्र त्यानंतर तिचा मोबा. स्विच ऑफ झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी टोल प्लाझा पासून ३० कि.मी. अंतरावर तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली.
पोलिसांनी या घटनेचा तपास करताना टोल प्लाझावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजवरून एका ट्रक चालकासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेनंतर तेलंगणासह संपूर्ण देश हादरून निघाला आहे.



















