पिपंरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०३.२०२०
पिंपरी– पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दर महिन्याला मानकरी म्हणून गौरविले जात होते. जो अधिकारी त्या महिन्यामध्ये उत्तम काम करेल त्याची निवड केली जात होती तसेच संबंधित अधिकाऱ्याचे नाव व फोटो महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत होता. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून या नावांची घोषणाच झाली नसून सहा महिन्यांपूर्वीच्याच मानकऱ्याचे छायाचित्र आजही महिन्याचा मानकरी म्हणून संकेतस्थळावर चिटकविण्यात आले आहे. आयुक्तांचे दूर्लक्ष की गेल्या सहा महिन्यांत महापालिकेत एकही अधिकारी मानकरीपदासाठी “लायक’ ठरला नाही, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. अधिकाऱ्यांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी “महिन्याचे मानकरी’ ही अभिनव योजना पालिकेत राबविली जात होती.



















