सातार(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.१०.२०२०
महाबळेश्वर- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महाबळेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात शहर वासीयांचे कोरोनापासून रक्षण व्हावे म्हणून पल्लवी पाटील यांनी जे अतुलनीय कार्य केले आहे त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांना “कोविड योद्धा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांचे हस्ते सन्मानपत्र, शॉल, भारतीय राज्यघटनेची प्रत देऊन पल्लवी पाटील यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक संजय पिसाळ, हॉर्स एड पोनी युनियनचे अध्यक्ष जावेद खारखंडे, इम्रान डांगे, शगिर बडाने, सुमित कांबळे यांचेसह मान्यवर उपस्थित होते. प्रामाणिकपणे जनताभिमुख काम करण्यासाठी नेहमी तत्पर असून या पुरस्काराने काम करण्यासाठी बळ मिळाल्याची प्रतिक्रिया पल्लवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.



















