पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.०२.०७.१९
मावळ- तालुक्यातील सांगवडे गावातील शेतकरी महेश राक्षे यांना मुलगी झाली. त्यांचा त्यांनी घोड्यावरून पेढे वाटून मुलगी जन्मल्याचा आनंद साजरा केला. त्यांनी संपूर्ण सांगवडे गावाला घोड्यावरून पेढे वाटले. सध्या समाजात मुलगी झाल्या नंतर काही लोकांना खुप वाईट वाटत.परंतु सांगवडे गावातील महेश राक्षे यांनी घोड्यावरून पेढे वाटुन समाजा पुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. या पेढे वाटण्याची चर्चा पूर्ण मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जोरात सुरू आहे.



















