चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०२.२०२०
नागभीड- तालुक्यातील येनोली माल येथील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाची सांगड घालता आली पाहिजे. तसेच समाजात वावरताना हुशारीने आणि प्रामाणिकपणे राहता आले पाहिजे. आनद मेळावे व्यवहारिक ज्ञान बाल आनंद मेळाव्यात व्यक्त केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थ, विक्रीसाठी आणले होते. ‘इडली घ्या कोणी चिवडा घ्या, डोसा घ्या, गुपचूप घ्या, डोकला घ्या असे आवाज चिमुकल्यांच्या तोंडून सहजपणे निघत होते. असे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणले होते. खरेदीसाठी पालकांनी व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व त्यांचे व्यवहारिक कौशल्य पाहून पालकही हरपुन गेले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. या मेळाव्यातून मुलांच्या मनात असलेल्या कौशल्यांना चालना देण्यासाठी उपक्रम आयोजित केल्याचे शाळेचे मुख्यध्यापक श्री.फुलझेले सर यांनी सांगितले. सदर बाल मेळावा साठी प्रमुख पाहुणे डॉ.गुरनुले साहेब व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.महादेव सोनवणे यांची उपस्थिती होती या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वाढनकर सर व शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामस्थ व पालक आदी जण उपस्थित होते.



















