नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२४.०५.२०२०
येवला- तालुक्यातील एका गावात शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या खताच्या बाबत काळाबाजार उघड झाला आहे. येवला पोलिसांनी धाड टाकून हे रॅकेट उध्वस्त केले आहे. येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील सागर कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी ठेवलेला अनुदानीत युरिया खत शेतकऱ्यांना न देता युरियाची बॅग बदलून औद्योगिक वापरासाठी विक्री करत असतांना हा छापा टाकण्यात आला आहे.
नाशिक कृषि सहसंचालक विभागाच्या पथकाने छापा मारुन २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मालाच्या ‘टेक्निकल ग्रेड युरिया फाॅर इंडस्ट्रि्अल युज ओन्ली’ या नावाने भरलेल्या १४३ गोण्या जप्त केल्या आहे, पथकात विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजीत गुमरे, जिल्हा गुणवत्ता निरिक्षक किरण विरकर, येवल्याचे कृषि अधिकारी कारभारी नवले आदींनी ही कारवाई केली.
सदर संशयिताच्या विरुद्ध येवला पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ व भादंबि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















