नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
येवला- आज रंगपंचमी त्या निमित्ताने सर्व तरुण तयारीला लागले होते. येवल्यात १८ व्या शतकापासून सुरू असलेल्या रंगपंचमी सामन्याची परंपरा नवीन पिढीही अधिक आनंदाने जपत. ऐतिहासिक,सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असणाऱ्या शहरात रंगाची उधळण करत रंगाचे सामने येवल्याच्या रंगोत्सवाचे वैशिष्टे आहे. एकत्र जमलेले हजारो येवलेकर कोणी ट्रॅक्टर वरती तर कोणी मैदानात रंग खेळण्यास उतरलेले.
पूर्वीच्या काळी मामलेदार गल्लीत रंगांचे सामने होत असत. तर दुसरा सामना बुरुड गल्ली व डी.जी. रोडवरती होत असत. डोळ्यांचे पारणे फेडावे असे सामने रंगत. पाहणाऱ्यांची मने आनंदाने फुलून जात. जोशपूर्ण सामने अनेक वर्षापासून खेळले जातात. पूर्वीच्या काळात बैलगाडी वरती हे सामने रंगत. परंतु आता बैलगाडीची जागा मात्र ट्रॅक्टरने घेतली. त्यामुळे पिंपची संख्या वाढली आहे. रंग खेळण्यांची ही संख्या वाढली आहे. आज अगदी सकाळपासूनच रंग खेळण्यास सुरुवात झाली. मात्र रंगाचे सामने आजही तितक्याच उत्साहात खेळले गेले.
उत्सवप्रेमी आणि तालमिंचे गाव असल्याने हळकडीच्या, ढोल – ताशांच्या गजरात जोषपूर्ण रंगाच्या सामन्यांना सुरुवात झाली. सायंकाळी साडेसहा च्या सुमारास सामन्यांना पूर्णविराम दिण्यास्त आला. हे मनमोहन टाकणारे दृश्य केवळ वर्णन करूनच भागणार नाही तर हे दृश्य डोळ्यात आठवणारे आहे.
रंगपंचमी सामन्याची सुरुवात पाहुण्यांना पुष्पहार घालून, सत्कार करून परस्परांना आलिंगन देऊन सुरुवात झाली. सकाळपासूनच गल्लो गल्ली परस्परांवर रंग टाकत. स्वतःचेच तोंड आकर्षक पद्धतीने रंगवून घेत. युवक युवतींचे गट फिरत. होते. महिलाही रंग खेळण्यात पुढारलेल्या होत्या.
रंगपंचमीच्या सामन्याची सुरुवात टिळक मैदानातून पाचला तर त्या पाठोपाठ डी.जी. रोडवरति दुसरा सामना रंगला. शहरातील सर्व व्यवसायिक आपला व्यवसाय बंद ठेऊन रांगोउत्सवात सहभागी झाले. येवल्यातील समण्या प्रमाणे भारतात क्वचितच ठिकाणी खेळले जात. ही परंपरा,उत्साह, आनंद याला कोठेही गालबोट लागणार नाही त्या साठी रांगोत्सव समितीने जाहीर केलेल्या आचासरसहितेचे पालन करत आपला आनंद व्यक्त करत जोषपूर्ण सप्तरंगी रंगाने खेळले गेले.



















