बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.२/१२/१८
आष्टी, भाजपाला रामराम केलेल्या सतीष शिंदे यांची राष्ट्रवादी कांग्रेसच्या बीड जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सतीष शिंदे यांनी तीन महिंन्यापुर्वी विजयी संकल्प मोळाव्या मध्ये बीड येथे राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितित बीड येथे राष्ट्रवादी मधे प्रवेश केला आहे. सतीष शिंदे यांच्या पत्नी जि.प.बीडच्या सदस्य आहेत.आष्टी येथील जय हनुमान तालीम पाडल्यामुळे शिंदे यांनी आष्टी तहसील कार्यालयात उपोषण केले होते,मा.धनंजयजी मुंडेनी त्यांचे उपोषण सोडले. तेव्हाच त्यांनी राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये कार्यकर्त्यासह जाण्याचा निर्धार केला होता.शिंदे यांची निवड झाल्याने आष्टी,पाटोदा, शिरुर तसेच संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनता व तरुण युवकांनी आनंद व्यक्त केला आहे.आगामी लोकसभा,विधानसभा मुळे त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.



















