पिंपरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.२०२२
चिंचवड- विधान सभा विरोधी पक्षनेते अजित पवार व पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या संयुक्त वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी कॅाग्रेस सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष संजय औसरमल यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चिंचवड येथील मदर तेरेसा वृध्दाश्रमास धान्य, किराणा, औषधोपचार साहित्य, चप्पल अशा आवश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. चिंचवड येथील केंद्राई गोशाळेतील गोमातांना ६०० किलो चारा तर काळेवाडी येथील श्याम गोशाळेतील गोमातांना ६०० किलो चारा देण्यात आला. यावेळी आंबेंडकरी

चळवळीतील जेष्ठ नेते तुकाराम सूर्यवंशी महाराज, विनय शिंदे अध्यक्ष पर्यावरण विभाग, अध्यक्ष सेवा दल, आनंद मोरे निर्भीड पत्रकार सहाय्यक संपादक, शिवाजी गव्हाणे सिध्दार्थ जन्नू, सतिष घोडेराव, योगेश गायकवाड, बंडू शिंदे, संदिप पाटील, प्रकाश दाभाडे, विजू पोटे, अशोक येल्लाळे उपस्थित होते.



















