चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश्वर शेंडे
दि.११.०३.२०२०
• झालेले रस्ता बांधकाम दर्जेदार की निकृष्ट?
नागभीड- तालुक्यात झालेल्या रस्ते बांधकाम पाहण्या करीता भारत सरकारच्या वाहतूक विभागाचे अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड ते आरमोरी व नागभिड ते सिंदेवाही या मार्गाचे सर्वेक्षण करून रस्ता बांधकाम झालेले दर्जेदार की निकृष्ट दर्जाचे झाले आहे. याची माहिती घेण्याकरिता नागभिड येथे रस्ते तपासणी वाहन दाखल झाले असून आज दि.११ मार्च रोजी टी पॉइंट येथे डेमो घेण्यात आला. यावेळी तपासणी करताना सचिन पुंडे यांची चमू दखल घेत आहेत. त्यांनी झालेले काम दर्जेदार की निकृष्ट हे वाहन मशीन व्दारे अटोमॅटिक शोध घेत असते. हि सी.डी. भारत सरकारच्या वाहतूक विभागाला देण्यात येणार आहे. असे चमू प्रमुख पुंडे यांनी सांगितले.



















