चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०३.२०२०
नागभीड-राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे विज्ञान शाखेच्या वतीने नोबल पुरस्कार प्राप्त भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांनी आपल्या संशोधनाची घोषणा केली होती त्या दिनाच्या निमित्याने “राष्ट्रीय विज्ञान दिन ” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. डी. देशमुख होते,मार्गदर्शक प्रा. मनीष मते, डॉ. अतुल नागपुरे होते. तर प्रा. चक्रधर भुर्रे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मार्गदर्शक प्रा. मनीष मते म्हणाले की, “डॉ. सी. व्ही. रमण यांनी केलेले विविध संशोधन व त्यांचा रमण इफेक्ट या संशोधनाचा उलघडा करून देत आजही त्या शोधला किती महत्व आहे” तर डॉ. अतुल नागपुरे यांनी “विज्ञानाच्या ज्ञानशाखांचा अभ्यास दिवसेंदिवस किती सूक्ष्म होत चालला आहे.”हे पटवून दिले तर प्रा. चक्रधर भुर्रे यांनी “आपल्या देशात असणारा परंपरागत ज्ञान हाच विज्ञानाची उत्पत्ती होय.”असे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. डी. देशमुख यांनी, मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप प्रयत्न, कृती प्रदर्शित करून नवं समाज विज्ञानवादी करणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.कार्यक्रमा निमित्य विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.यावेळी संचालन प्रा. निलेश गोडे यांनी केले तर आभार प्रा. अंकुश कायरकर यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















