सोलापूर(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, नारायण पवार
दि.१५.०३.२०२०
माळशिरस- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.राजेंद्र गवई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभोदजी वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाने माळशिरस युवक तालुका अध्यक्षतेखाली तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये, शहरांमध्ये शाखा विस्तार करून तमाम दलित बांधवांना न्याय मिळवून देवून, तालुक्याच्या विकासासाठी दलित बांधवांच्या न्याय हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या माध्यमातून काम करणार असल्याने तमाम तालुक्यातील जनतेने सहकार्य करून गाव तिथे शाखा अस्तित्वात आणण्याचे कार्य करण्यास व कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत अशाप्रकारचे वचन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) युवक अध्यक्ष वैभव (भैय्या) धाइंजे दिले आहे.
शाखा बांधणीचे काम चालू असून तालुक्यातील जनतेने सहकार्य करून आमच्याशी संपर्क साधावा व न्याय हक्कासाठी एकत्रित लढावे व भीमसैनिकांनी संपर्क साधून शाखा वाढीसाठी सहकार्य करावे असे आवाहन तालुका युवक कार्याध्यक्ष दादासाहेब सावंत यांनी केले आहे.



















