बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२७.१२.१९
कडा- नांदेड येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शर्मा ट्रॅव्हल्सच्या लक्झरीला मध्यरात्री अचानक आग लागली. या भीषण अपघातात लक्झरी बस पूर्णपणे जळून खाक झाली, तरी या बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. आष्टी तालुक्यातील बीड-धामणगाव-अहमदनगर मार्गावरील सांगवी पाटण येथे शुक्रवारी(दि.२७) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर या मार्गावर फक्त मालवाहू वाहने आणि रात्रीच्या धावणाऱ्या ट्रॅव्हल्स असतात. त्यातच बसला आग लागली मात्र, सर्वांना शांततेत बसखाली उतरवण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर आल्यानंतर बसने जोरदार पेटल घेतला आणि काही वेळातच संपूर्णपणे बस जळून खाक झाली.



















