नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
लासलगाव- हिंगणघाट घटनेची पुनरावृत्ती लासलगाव येथे घडली असून एका महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेत ही महिला ५० टक्के भाजल्याची घटना घडली असून या बाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक शहरातील शासकीय रुग्णालय येथे जाऊन समक्ष पाहणी केली. तसेच पीडित महिलेला न्याय मिळवून देणार असल्याचा प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.
काय आहे प्रकरण ?
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लासलगाव बसस्थानकाच्या आवारात ही घटना घडली आहे.काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे तरुण शिक्षिकेला जाळण्यात आले होते. या घटनेनंतर सबंध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना नाशिक जिल्ह्यात अशी घटना घडल्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,लासलगाव येथील इंदिरानगरमधे वास्तव्यास असलेले पीडिता वय (३२) असून तिला तीन अपत्य आहे तिच्या पतीच्या निधनानंतर तिचे एका तरुणाशी प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते. सदरची युवतीही या युवकाला बरोबर मुंबई येथे किरकोळ कांदा विक्रीचा व्यवसाय करत होते अशी चर्चा आहे. पीडितेचा पती निधनानंतर संशयित रामेश्वर बरोबर प्रेम प्रकरण होते त्यानंतर विंचूर येथील लोणजाई देवीच्या मंदिरात माळ घालून लग्न केले होते नुकतेच संशयितेचा दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा झाल्याने तू मला सांभाळेल की जिच्या बरोबर साखरपुडा झाला आहे तिला संभाळणार या वरुन दोघांमधे चांगलीच खडाजंगी उडाल्याने या गोष्टचा राग आल्याने रागाच्या भरात येऊन पीडितेला पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.
पीडित तिच्या स्कुटी ऍक्टिवा गाडी क्रमांक एम एम १५ एच ए ७२७७ वर दत्तू बाळू जाधव यांच्या समवेत बस स्थानकावर आले दरम्यान तेथे संशयित रामेश्वर ऊर्फ बाळा मधुकर भागवत व निलेश पद्माकर केंदळे रा. टाकळी विंचूर या मित्रासोबत बसस्थानकावरील रसवंती गृहाच्या कोपऱ्यावर उभे होते तेथे हा प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे पोलीस कर्मचारी बी.व्ही.सांगळे, कैलास महाजन,बी.पी.कोते, महिला कर्मचारी सोनाली शिंदे,संगीता काकडे,सारिका जाधव यांनी बसस्थानकाकडे धाव घेत रुग्णवाहिकेला पाचारण केले व तातडीने लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शेंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.सदर पीडिता ५० टक्के झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला.
याप्रकरणी पोलिसांनी दत्तू बाळू जाधव आणि निलेश केदार या संशयितांना ताब्यात घेतले असून सायंकाळी निफाडचे पोलीस निरीक्षक आर.बी.सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी संशयिता समावेत घटना स्थळची पाहणी केली.



















