पिंपरी (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०४.२०२०
दापोडी- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे.त्यामध्ये सर्वत्र परवान्याची दारू विकण्यास देखील सक्त बंदी आहे.असे असूनही पुणे शहरातील दापोडी विभागात खुलेआमपणे बेकायदेशीर रित्या गावठी दारू(हातभट्टी) विक्री चालू आहे.इथे सरकारी परवाना प्राप्त दारू विक्रीची दुकाने कडकडीत बंद असून इथे हातभट्टी विक्री कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ? ही दारूविक्री पोलिसांच्या डोळ्यांदेखत होत असल्याने पोलिसांचे या दारूविक्रीत काही कनेक्शन आहे का ? असे प्रश्न आता स्थानिकांना पडले आहेत.तसेच ही दारूविक्री तात्काळ बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



















