सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.११.०३.२०२०
फलटण- लोणंद गावच्या हद्दीतील लोणंद-सातारा रोडवर लक्ष्मणराव शेळके यांच्या फार्महाऊस जवळ बेकायदेशीर बिगरपरवाना गौण खनिज वाळुचे उत्सखनन करत असल्याची माहिती लोणंद पोलिसांच्या खास बातमीदाराकडून मिळालेल्या खबरी वरून स.पो.नि. संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लोणंद गावच्या हद्दीतील लोणंद-सातारा रोडवर लक्ष्मणराव शेळके यांच्या फार्महाऊस जवळ आपसात संगणमत करुन बेकायदेशीर बिगरपरवाना गौण खनिज वाळुचे उत्सखनन करुन वाहन क्र. एमएच १२ एच डी ०९४८ एक टाटा कंपनीचा डंपरच्या मदतीने चोरीटी वाळुची वाहतुक करताना आरोपी सागर भगवान नलवडे (वय २४) रा. सोमजाईनगर वाई जि . सातारा , आणि किरण शिवाजी जाधव (वय २८) रा . वडारगल्ली, लोणंद ता. खंडाळा जि . सातारा या दोघांच्या विरोधात कारवाई करून लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सुमारे दहा हजार किमतीच्या दोन ब्रास वाळूसह अंदाजे अडीचलाख रूपये किमतीचा डंपर ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी पो.हवा. फैय्याज शेख यांनी फिर्याद दाखल केली. तर लोणंद पोलिस ठाण्याचे स.पो.नि संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील हि कारवाई करण्यात आली आहे.



















