पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.२६.०७.१९
मावळ- वडगाव नगरपंचायतीच्या वतीने कारगिल विजयी दिनानिमित्ताने युद्धात शहीद झालेल्या तसेच वीर जवानांनी प्राणाची बाजी लावून कारगिल युद्धात विजय संपादन केलेल्या घटनेस २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्य अर्चना म्हाळसकर, गटनेते नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रविण चव्हाण, विजय जाधव, चंद्रजीत वाघमारे,दिनेश ढोरे, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, पूजा वहिले व नगरपंचायत कर्मचारी नागरिक यांनी आदरांजली वाहिली.



















